नियमबाह्य काम न केल्यामुळेच माझे निलंबन; आरोग्यमंत्र्यावर बोट ठेवत मुख्यमंत्र्याला आलेले पत्र


पुणे |

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉक्टर भगवान पवार यांनी आपल्या निलंबनाबाबत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून एक गौप्यस्फोट केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, नियमबाह्य काम न केल्याने आपल्यावर मंत्र्यांकडून निलंबनाची कारवाई केली गेली आहे.

हे गंभीर आरोप करताना मुख्यमंत्री शिंदे यांना लिहिलेल्या या पत्रामध्ये पवार म्हणाले की, नियमबाह्य टेंडर काढण्यासाठी मला मंत्र्यांकडून कात्रजमधील ऑफिसला बोलावले जायचे. दबाव टाकला जायचा परंतु मी तसं करण्यास नाकार दिला आणि याच कारणामुळे माझ्यावर निलंबनाची कारवाई झाली. तसेच मी त्या विरोधात मॅडमध्ये दावा दाखल केल्यानंतर माझा मानसिक छळही करण्यात आला.

पुणे आरोग्य अधिकारी प्रमुख पद रिक्त करण्यासाठी माझ्याविरुद्ध खोट्या तक्रार संदर्भात चौकशी समिती स्थापन करण्यात आली. तसेच चौकशी न करताच महापालिकेकडून माझ्यावर कुठलेही चुकीचे शेरे नसतानाही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे ही कारवाई मी एक मागासवर्गीय अधिकारी असल्याने हेतू पुरस्कार मला त्रास देण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप पवार यांनी केला.

Post a Comment

0 Comments