मोठी बातमी! लोकसभेच्या रणधुमाळीत महाराष्ट्रात विधान परिषदच्या निवडणुकीची घोषणा


मुंबई |

राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना निवडणूक आयोगाकडून आणखीन एका निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. आता विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघ आणि कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या दोन जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. तसेच, नाशिक आणि मुंबईच्या शिक्षक मतदारसंघांसाठीची ही निवडणूक जाहीर झाली आहे. त्यानुसार आता, 2 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लवकरच पार पडणार आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 10 जून रोजी 2 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघाच्या जागेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 13 जून रोजी मतमोजणी होणार आहे. सध्याच्या घडीला विलास पोतनीस हे मुबंई पदवीधर मतदारसंघात विद्यमान आमदार आहेत. कोकणात निरंजन डावखरे हे विद्यामान आमदार आहेत. यासह नाशिकच्या शिक्षक मतदार संघावर किशोरे दराडे विद्यमान आमदार आहेत. तसेच, कपिल पाटील हे मुंबई शिक्षक मतदारसंघात विद्यमान आमदार आहेत.

या सर्वांचा विधान परिषदेचा कार्यकाळ 7 जुलै 2024 रोजी संपणार आहे. या कारणामुळे निवडणूक आयोगाने या चार जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी येत्या 15 मे रोजी नोटिफिकेशन निघेल. त्यानंतर अर्ज भरण्याची शेवटची तारीख 22 मे 2024 असेल. 24 मे रोजी सर्व अर्जांची छाननी केली जाईल. त्यानंतर 27 मे ला अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असेल. 10 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल. १३ जूनला मतमोजणी होईल आणि 18 जून रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेली असेल.

Post a Comment

0 Comments