धाराशिव | आंब्याच्या रसामध्ये टाकल्या झोपेच्या गोळ्या, कुटुंबातील सर्वांना ठार मारण्याचा प्रयत्न


आंब्याच्या रसामध्ये झोपीच्या गोळ्या टाकून कुटुंबाला मारण्याचा कट रचणाऱ्या नंदगावच्या महिलेविरुद्ध नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी नामे-भाग्यवती महेशमुमार चिनगुंडे, रा. नंदगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दिनांक २४ मे रोजी रोजी नंदगाव येथे फिर्यादी नामे- महेशकुमार जवाहरलाल चिनगुंडे, वय ४८ वर्षे, रा. नंदगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना व त्यांचे घरातील इतर लोकांना अज्ञात कारणासाठी आंब्याच्या रसामध्ये झोपीच्या गुंगीकारक गोळ्या ज्यांचे जानकार वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्याशिवाय अयोग्य मात्रेचे सेवन केल्यास जिवीतास हाणी होवू शकते.

 हे माहित असताना अशा गोळ्या आंब्याच्या रसात टाकल्याने फिर्यादी व त्यांचे घरातील लोकांनी सेवन केल्याने त्यांना गुंगी सेवून झोप लागून जाग आल्यास शारिरीक पिढा झाली आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- महेशकुमार चिनगुंडे यांनी दिनांक २८ मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 328 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Post a Comment

0 Comments