पुणे |
अपघात प्रकरणाला आता अनेक वेगवेगळे फाटे फुटू लागले आहेत. याकडे केवळ राज्य नाहीतर आता देशाचं लक्ष लागलं आहे. अशातच आता काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी यामध्ये उडी घेतली आहे. नुकतेच पुण्यात राज्याचे गृहमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येऊन गेले होते. यावर धंगेकर यांनी भाष्य केलं होतं. तसेच धंगेकर यांनी पुण्यातील पबमधील पोलीस कॉन्स्टेबल यांचे फोटो सोशल मीडियावर ट्विट केले आहेत.
ट्विटमध्ये काय म्हणाले रवींद्र धंगेकर?
धंगेकर म्हणाले की”राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मी एक गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो , कल्याणीनगर अपघातानंतर तपासात अक्षम्य चुका होऊन देखील पुणे शहराचे पोलीस कमिश्नर अमितेश कुमार यांना अजूनही कोणी दोषी आहेत असे वाटत नाही. अर्थात जो स्वतःच बिल्डरच्या पाकिटावर काम करतोय तो कसा कुणावर कारवाई करणार…? असो, आजपासून मी तुम्हाला दररोज एका पोलिस स्टेशनवर सुरू असलेल्या गैर-कारभाराची कथा पाठवणार आहे.”
“दिवस 1 ला – मुंढवा पोलीस स्टेशन हे पोलीस स्टेशन अवघे 3 कर्मचारी चालवतात.त्यापैकी निलेश पालवे ,काळे हे कॉन्स्टेबल सर्व पब्स ,हॉटेल येथून हप्ते गोळा करण्याचे काम करतात.”
फोटोचा दाखला दिला
“सोबत एक फोटो जोडत आहे ज्यात हे वसुली कॉन्स्टेबल वॉटर्स नावाच्या पबमध्ये पार्टी करताना दिसून येत आहेत. आम्हा पुणेकरांच्या वतीने आपणांस विनंती आहे की,पुणे बिघडविणाऱ्या या पोलीस कॉन्स्टेबलची यांची तातडीने चौकशी करत यांना निलंबित करा ,अन्यथा 48 तासात यांचे इतर व्हिडिओ देखील असेच ट्विट करण्यात येतील. पुन्हा भेटुयात नव्या पोलीस स्टेशनचा ग्राउंड रिपोर्ट घेऊन. जय हिंद ,जय पुणेकर..!”, अशी पोस्ट रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.
राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मी एक गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो , कल्याणीनगर अपघातानंतर तपासात अक्षम्य चुका होऊन देखील पुणे शहराचे पोलीस कमिश्नर अमितेश कुमार यांना अजूनही कोणी दोषी आहेत असे वाटत नाही.
दरम्यान पुणे अपघाताप्रकरणी विशालवर पुरावे नाहिशे करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी साथीदारांना पोलीस कोठडी देण्यात यावी. यामुळे आम्हाला अधिक माहिती मिळवू शकतो असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी कोर्टात केला आहे.
याप्रकरणी पोलीस कोठडीची कोणतीही आवश्यकता नाही, असं कोर्टाने स्पष्ट केलं आहे. तसेच न्यायलयीन कोठडीत चौकशी केली जाईल, असं कोर्टाने म्हटलं आहे. कोर्टाने आता याचपार्श्वभूमीवर विशालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
0 Comments