छगन भुजबळ यांच्याकडून तुतारीचा प्रचार; शिंदे गटाकडून राजीनाम्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जेष्ठ नेते छगन भुजबळ  हे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या तुतारीचा प्रचार असल्याचा खळबळजनक शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. आपल्याकडे फोटो आणि व्हिडिओ सुद्धा असल्याचे सुहास कांदे यांनी म्हटले आहे. त्यामुळे महायुतीमध्ये खळबळ उडाली आहे. दिंडोरी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचा मेळावा पार पडला, यावेळी कांदे यांनी जाहीरपणे भुजबळ यांच्यावर आरोप केला.

सुहास कांदे म्हणाले, नांदगाव मतदार संघातून जास्त मते भारती पवार यांना मिळाले तर त्याचे श्रेय आम्हाला आणि शिवसेनेला जाणार आहे. हे श्रेय आम्हाला मिळू नये, यामुळे छगन भुजबळ तुतारीचा (राष्ट्रवादी काँग्रस शरदचंद्र पवार) प्रचार करत आहेत. छगन भुजबळ यांना महायुतीमधून मंत्रीपद मिळाले आहे आणि काम करायच्या वेळी ते तुतारीचा प्रचार करत आहेत. तुम्हाला तुतारीचा एवढा पुळका असेल तर तुम्ही मंत्रीपदाचा राजीनामा द्या आणि खुशाल तुतारीचे काम करा. भाजपाचेही नेते जर शांतपणे हे पाहत असतील तर हे दुर्दैव आहे”, असं सुद्धा त्यांनी म्हंटल.

दुसरीकडे छगन भुजबळ यांनी मात्र सुहास कांदे यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. सुहास कांदे हे चुकीची विधाने करत असून आम्ही महायुतीचे काम करत आहोत असं भुजबळांनी स्पष्ट केलं. आमदार काहीही बोलत असले तरी कार्यकर्त्यांनी मात्र महायुतीचा प्रचार करावा, अशा सूचना आम्ही दिल्यात असे छगन भुजबळ यांनी सांगितलं. सुहास कांदे हा आमचा विरोधक आहे, हे सर्वांना माहीत आहे. ते नेहमीच आमच्या विषयी खोटे बोलतात. भुजबळांवर टीका केल्याने त्यांना जास्त प्रसिद्धी मिळते असं म्हणत भुजबळ यांनी सुहास कांदे यांच्यावर पलटवार केला आहे.

Post a Comment

0 Comments