“मला लॉक केलं आणि कपडे काढून…”, अभिनेत्रीच्या आरोपाने खळबळ


स्ट्रगलिंगकाळात अभिनेते, अभिनेत्री कशा कशाचा सामान करतात हे त्यांचं त्यांना माहिती असतं. यामध्ये कास्टिंग काऊचचे प्रकार वारंवार समोर येताना दिसतात. आता एका प्रसिद्ध अभिनेत्रीने तिला आलेला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव सांगितला आहे. ‘शुभ शगुन’ मालिकेदरम्यान निर्माता कुंदन सिंहने तिला त्रास दिला आहे आणि पाच महिन्यांची फी अजून दिली नाही, असा आरोप तिने केलाय.

प्रोडक्शनची लोकं खूप अफवा पसरवतात. त्यांच्याकडे बोलायला काहीही नसतं. मी गोरेगावच्या एका स्टुडिओत काम करत होते. तिथं हे सर्व घडलं असल्याचा दावा कृष्णाने केला. कुंदन खूप हुशार माणूस आहे. त्यांनी मला ‘बेटा-बेटा’ म्हणत मूर्ख बनवलं. ऑक्टोबरमध्ये तक्रार केली असं समजताच पैसे मिळणार नाही असं सांगितलं. तो माझ्याकडे वेगळ्या नजरेनं पाहायचा. तेव्हा मला स्वाती ठानावालेनं मेल करत सांगतिलं की ती सध्या सुरक्षिततेची जबाबदारी घेत काम करत आहेत.

त्यानंतर मालिकेचा इपी प्रभात आणि एचओपी समीर होता. बालाजीच्या सेटवर देखील असंच घडलं असल्याचं तिने सांगितलं. मला पैशाच्या चेकसाठी भांडावं लागत होतं. मला काढून टाकून दुसऱ्या अभिनेत्राला त्यांनी संधी दिली, असं कृष्णा म्हणाली.

त्यांनी पहिल्यांदा लॉक केलं तेव्हा आसमांने माझा हात पकडला होता. मी शूट करणार नसल्याचं म्हटलं तर त्यांनी कपडे बदलून शूट करायला सांगितलं. त्यावेळी आसमांने माझी मदत केली. मी घाबरले होते, तेव्हा कुंदन तिथे आहे हे मला माहीत नव्हतं, असं कृष्णा म्हणाली.

पुढे तिने सांगितलं की एकदा तर ती वॉशरूममध्ये होते तर वॉशरूमचा दरवाजा बाहेरून बंद केला होता. मी 12 तास काम केलं होतं मला आणखी जास्त वेळ थांबायचं नव्हतं. माझं लग्न होतं मी कुंदनला म्हटलं होतं की माझं लग्न आहे. मला पैसे हवे आहेत. त्यावेळी इपी आणि इपीओ तिथं उभे होते. त्यावेळी कुंदन म्हणाला की मुलगी असल्याने हे सर्व करत आहे वाचलीस.

ती आजारीही पडत आहे तिला एंग्झायटीचा सामना करावा लागत आहे. या शोकडून तिला एकूण 39 लाख रूपये मिळणं बाकी आहेत. या शोने कोणाचेच पूर्ण पैसे दिले नाहीत, असंही तिने सांगितलं.

Post a Comment

0 Comments