धाराशिव | पत्र्यावरील दगड डोक्यात पडून वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यूमहाराष्ट्रासह जिल्हाभरात वादळी वारे व अवकाळी पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. वादळी वाऱ्यात घरांचे मोठे नुकसान होऊन जीवित व वित्तहानी होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे.

धाराशिव तालुक्यातील सांगवी येथे रविवारी (दि.२६) रात्री दहाच्या सुमारास अचानक वादळी वारे व जोराचा पाऊस सुरू झाला. यावेळी पत्र्यावरील दगड डोक्यात पडून वृद्ध शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. हनुमंत कोळपे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. कामेगाव व बोरगावात ३५ हून अधिक घरांचे मोठे नुकसान झाले आहे.

समुद्रवाणीसह परिसरातील आंब्याच्या बागा, केळीच्या बागा अक्षरशः भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा अस्मानी सुलतानी संकट आले आहे. खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांनी रात्री साडेदहाच्या सुमारास सांगवी गावात पोहोचून पाहणी केली. कोळपे कुटुंबियांचे सांत्वन करत महसूल विभाग, आरोग्य विभागाला पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या.

Post a Comment

0 Comments