माढा |
भाजपची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या कुटुंबीयांच्या अस्तित्वाची मानली गेलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात बाजी कोण मारणार, याची सार्वत्रिक उत्सुकता वाढली आहे.
दोन्ही पक्षांकडून विजयाचे दावे होत असताना दुसरीकडे विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, यावर मोठ्या प्रमाणावर पैजाही लागल्या आहेत. काहीजणांनी चक्क मेंढ्याची पैज लावली आहे. काहीजणांनी तब्बल ११ बुलेट गाड्यांची तर काहीजणांनी थेट थर मोटारीपर्यंत लावलेली पैज हा चर्चेचा विषय झाला आहे.
लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा नुकताच पार पडला असून, लोकसभा निवडणुकीत विजयी कोण होणार? याबाबत मतदारांमध्ये उत्सुकता आहे. माढा लोकसभेत चुरशीची लढत झाली. असे असताना मात्र माढ्याचा खासदार कोण होणार? तुतारी वाजणार की कमळ फुलणार याचे आडाखे बांधले जातात.
पक्षाचे पदाधिकारी, उमेदवारांचे समर्थक आपलाच उमेदवार निवडून येणार असे दावे करतात. अशातच राष्ट्रवादीचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील समर्थक बंधूंनी चक्क ११ बुलेटची पैज लावलीय.
मोहिते-पाटील यांचे समर्थक आणि माढा तालुक्यातील योगेश पाटील व नीलेश पाटील या युवा शेतकरी भावंडांनी माढ्यातून तुतारीच निवडून येणार, असा आत्मविश्वास घेऊन भाजपसह समर्थकांना ११ बुलेटच्या पैजेचे चॅलेंज उभा केले आहे. हे चॅलेंज भाजपसह रणजितसिंह निंबाळकरांच्या समर्थकांकडून अद्याप स्वीकारले नाही. ११ बुलेटची किंमत ३० लाखांहून अधिक होते.
भाजपविरोधी वातावरण म्हणून आम्हाला विश्वास
सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोहिते-पाटील कुटुंबीयांचे मोठे योगदान आहे. भाजपविरोधी वातावरण आणि शरद पवारांसह मोहिते-पाटलांविषयी निर्माण झालेली सहानुभूती यामुळे माढ्यात मोहिते-पाटील निवडून येतील. त्यामुळे आम्हा दोघा भावंडांना आत्मविश्वास आहे. भाजपच्या सर्थकांना मी चॅलेंज दिले आहे. योगेश पाटील, रा. बावी, ता. माढा, मोहिते-पाटील समर्थक.
पैज ठरली तर शोरूमला पैसे भरून नोटरी करणार मोहिते-पाटील समर्थकांचे चॅलेंज स्वीकारुन जो कुणी शर्यत लावेल अथवा पैज स्वीकारेल ते दोघेही बुलेटच्या शोरूममध्ये जाऊन बुकिंग करून पैसे भरायचे जो विजेता होईल तो ११ बुलेटची शर्यत जिंकणार. ही सर्व शर्यत नागरिकांच्या उपस्थितीत नोटरीवर रीतसर ठरवली जाणार आहे.
0 Comments