१२ वर्षीय मुलीवर दोनशे रुपये देऊन अत्याचार, मुलगी सहा महिन्याची गरोदर


पुणे |

मैत्रिणीला भेटण्यासाठी गेलेल्या १२ वर्षीय मुलीला २०० रुपयांचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात नेले असता मुलगी सहा महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आले. निगडी येथे डिसेंबर २०२३ मध्ये हा प्रकार घडला. 

सुलतान शेख (३०, रा. निगडी ओटास्कीम), असे अटक केलेल्याचे नाव आहे. पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने याप्रकरणी १९ मे रोजी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सहायक पोलिस आयुक्त राजू मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुलतान शेख हा रिक्षा चालक आहे. ताे भाडेतत्त्वारील रिक्षा चालवतो. पीडित मुलगी तिच्या कुटुंबियांसह चिंचवड परिसरात वास्तव्यास आहे. पीडित मुलगी तिच्या निगडी येथील मैत्रिणीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेली असता सुलतान शेख याने रिक्षातून तिला घरी सोडण्याचा बहाणा केला. त्यातून तिच्याशी ओळख केली. त्यानंतर वेगवेगळ्या तीन ठिकाणी नेले. तिला २०० रुपये देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यातून मुलगी गरोदर राहिली. दरम्यान तिला त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात नेले. त्यावेळी ती सहा महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आले.

Post a Comment

0 Comments