बारामतीच्या लढाईत मोठा ट्विस्ट, रुपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ



महाराष्ट्रात आज लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं.संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या बारामती मतदार संघाचाही यामध्ये समावेश होता. अशात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा तथा अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ईव्हीएम मशीनची पूजा केल्याने चाकणकर या अडचणीत सापडल्या आहेत. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. रुपाली चाकणकर या खडकवासला परिसरातील एका मतदान केंद्रावर पोहचल्या. मतदान सुरु होण्यापूर्वी त्या औक्षण करण्याचे ताट घेऊन मतदान केंद्रात दाखल झाल्या.

रुपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल
या ताटात एक दिवा पण ठेवलेला होता. त्यानंतर त्यांनी थेट मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीनची पूजा केली.चाकणकर यांच्या या प्रकारामुळे केंद्रातील उपस्थित अधिकारी देखील भांबावले. असं मतदान केंद्रांवर जाऊन पूजा करणे निवडणूक आयोगाच्या नियमाविरुद्ध असल्याचं सांगत रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 पुणे पोलिसांकडून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये रूपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. चाकणकर  यांचा पूजा करतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.


EVM ची पूजा करणं पडलं महागात-
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडीयावर अनेकांनी निवडणूक आयोगाच्या एक्स अकाउंटला टॅग करत याबद्दल विचारणा केली आहे. ईव्हीएम मशीनची पूजा करतानाचा रुपाली चाकणकर यांचा फोटो राज्यभर व्हायरल झाला आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर  यांच्यावर आता सर्वच स्तरातून टीका करण्यात येत आहे.या सर्व प्रकाराची राज्यात एकच चर्चा रंगली आहे. या प्रकरणी समाज माध्यमावर उलटसुलट चर्चा सुरु आहेत.

Post a Comment

0 Comments