वाशी |
वाशी तालुक्यातील केळेवाडी येथे ‘खेकडा’ म्हटल्याने एका महिला आणि मुलास डोके भिंतीवर आपटुन लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी वाशी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी नामे-विनोद वसंत केळे, रा. केळेवाडी, ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि. 20.05.2024 रोजी 12.00 वा. सु. केळेवाडी येथे फिर्यादी नामे- रेष्मा विठ्ठल केळे रा. केळेवाडी ता. वाशी जि. धाराशिव, व त्यांचा मुलगा नामे- बाजीराव विठ्ठल केळे यांना नमुद आरोपींनी खेकड्या का म्हणलात हा राग मनात धरुन शिवीगाळ करुन फिर्यादीचे मुलास उचलुन खाली फेकुन देवून डोके भिंतीवर आपटुन लाकडी दांड्याने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- रेष्मा केळे यांनी दि.23.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
0 Comments