इंडिया आघाडी जिंकणार तब्बल एवढ्या जागा अरविंद केजरीवाल यांचे भाकीत?


मुंबई |

लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा नुकताच पार पडला. यादरम्यान विविध पक्षाचे नेते प्रचारसभेत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशामध्ये भाजपचे नेते आणि गृहमंत्री अमित शाह यांनी आम आदमी पक्षाला समर्थन करणारे पाकिस्तानी आहेत, असा आरोप केला होता.

यावरून आता आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी पलटवार करत अमित शहांवर टीका केली आहे. 'दिल्ली आणि पंजाबमधील लोक पाकिस्तानी आहेत का?' असा सवाल त्यांनी केला. तसेच, यावेळी त्यांनी इंडिया आघाडीला किती जागा मिळणार? यांचेदेखील भाकीत केले. 

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, "भारतात 4 जूनला इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. इंडिया आघाडीला 300हुन अधिक जागा मिळणार आहेत." असा दावा त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की, "लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा पूर्ण झाला. जसजसे निवडणुका होत आहेत, तसतसे हे स्पष्ट होत आहे की 4 जूनला मोदी सरकार पडणार आहे. त्यानंतर देशात इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. अनेक सर्वेक्षणांमध्ये 4ला इंडिया आघाडीला स्वबळावर 300हून अधिक जागा मिळणार आहे, असे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे इंडिया आघाडी देशाला स्वच्छ आणि स्थिर सरकार देण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे." असा विश्वास त्यांनी दर्शवला आहे.

Post a Comment

0 Comments