महिला व बालविकास विभाग अंतर्गत कार्यरत धर्मवीर संभाजीराजे सामाजिक बहुउद्देशीय संस्था, तुळजापूर संचलित निरीक्षणगृह / बालगृह धाराशिव येथे १ मे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. संस्थेच्या प्रांगणात संस्थेचे सचिव सुधीर कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
उपस्थितांनी राष्ट्रगीत गायन केले. तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी बालकल्याण समितीचे अध्यक्ष विजयकुमार माने, सदस्या अँड सुजाता माळी,अँड मैना भोसले,अँड दिपाली जहागीरदार ,अँड दयानंद काळुंके,महेश मेंढेकर, संस्थेचे कर्मचारी माधुरी हरवले, कदम बी.आर,शिंदे.ए. एल, शहापुरे आर.के,आशा भिसे,प्रशांत मते,अक्षय निपाणीकर आदींची उपस्थिती होती.
0 Comments