प्रणिती शिंदे 23 हजार मतांनी निवडून येणार?


  सोलापूर लोकसभा निवडणूक यंदा अतिशय चुरशीची आणि काटेंकी टक्कर झाल्याचे पाहायला मिळाले. एकमेकांच्या विरोधात असलेले उमेदवार दोघेही विद्यमान आमदार आहेत. काँग्रेसच्या तीन टर्म आमदार राहिलेल्या प्रणिती शिंदे यांनी काँग्रेस महाविकास आघाडी कडून उमेदवारी मिळवली तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपकडून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना महायुतीची उमेदवारी मिळाली.

दोन्हीही आमदार अभ्यासू, आक्रमक आणि त्याच ताकतीचे असल्याने या निवडणुकीत कोण विजयी होणार हेच प्रश्न एकमेकाला लोक विचारत आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी 59 टक्के एवढे मतदान झाले आहे. वीस लाख मतदारांपैकी बारा लाख मतदारांनी मतदान केले. आता चार जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे परंतु सोलापुरात आता पैजा लागल्या आहेत.

भाजप कार्यकर्त्यांनी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपलाच उमेदवार विजयी होईल असा दावा केला आहे. एकीकडे असे असताना दुसरीकडे मात्र सोलापुरात छावा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष  योगेश पवार यांनी मात्र काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे या 23000 मताधिक्यांने विजयी होतील अशी आकडेवारी समोर आणली आहे.

त्यांनी आपल्या लेटर पॅड वर सहा विधानसभा मतदारसंघात कोणाला किती मते मिळणार याची आकडेवारी व्हायरल केली आहे. त्यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकारांना पत्रकार परिषदेत साडेपाच या वेळेत दिलेल्या आकडेवारीनुसार अंदाज व्यक्त केला आहे. परंतु नंतर वाढलेली पस्तीस हजार मतांबाबत त्यांनी यामध्ये कोणताही उल्लेख केलेला नाही. दरम्यान योगेश पवार यांनी समोर आणलेली आकडेवारी पहा.


Post a Comment

0 Comments