महायुतीच्या उमेदवारीवरून धाराशिवमध्ये राजकारण तापले, धनंजय सावंत मुंबईत ठाण मांडूनधाराशिव |

धाराशिवमध्ये महायुतीला कलहाचा संसर्ग झाला आहे. अर्चना पाटील यांची उमेदवारी जाहीर होताच मंत्री तानाजी सावंत मतदारसंघातून गायब झाले असून, त्यांचा पुतण्या धनंजय सावंत मुख्यमंत्र्यांच्या दरबारी मुंबईत न्याय मागण्यासाठी ठाण मांडून बसला आहे.

धाराशिवमध्ये उमेदवार महायुतीचा उमेदवार घोषित करण्यास वेळ लागला. सुरुवातीला प्रवीणसिंह परदेशी यांचे नाव चर्चेत आणण्यात आले. त्यांचे नाव नुसतेच चर्चेत राहिले. त्यानंतर ही जागा आघाडीत अजित पवार गटाच्या माथी मारण्यात आली. परंतु अजितदादालाही उमेदवार मिळाला नाही. 

आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे यांचा पत्ता फेकण्यात आला. परंतु या दोघांनी नकार दिल्याने भाजपचे आमदार असलेले राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन त्यांना उमेदवारी देण्यात आली. धाराशिवची जागा आम्हाला सोडा यासाठी तानाजी सावंत यांनी जंग जंग पछाडले. परंतु त्यांना ना भाजपने थारा दिला नाही.

Post a Comment

0 Comments