“न्यूडिटी दाखवण्यात मला…”, ऐश्वर्या रायच्या विधानाने सगळीकडे एकच चर्चा


मुंबई |

विश्वसुंदरी म्हणून जगभरात ओळख असणाऱ्या ऐश्वर्या रायने लाखो लोकांच्या मनावर अधिराज्य केलं आहे. आपल्या अभिनयाने तिने घराघरामध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. 90चं दश्क ऐश्वर्याने चांगलंच गाजवलं होतं. आज देखील ऐश्वर्याचे चाहते तिचे चित्रपट तेवढ्याच उत्साहामध्ये पाहतात.

ऐश्वर्याचा  चाहतावर्ग फक्त भारतातच नाही तर परदेशात देखील असल्याचं पहायला मिळतं. ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’च्या रेड कार्पेटवर एखादी बॉलिवूड अभिनेत्री जाते, तेव्हा तिथले फोटोग्राफर आणि मीडियासुद्धा अनवधानाने ‘ऐश्वर्या’ म्हणून हाक मारत असतात. दरम्यान, ऐश्वर्याने अनेक मुलाखती दिल्या मात्र, सध्या ऐश्वर्याची एक जूनी मुलाखतीची चर्चा आहे.

काय आहे प्रकरण?
सोशल मीडियावर ऐश्वर्या रायचा एक जूना व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिला न्यूडीटी बदल विचारण्यात आलं. भारतीय चित्रपटांमध्ये ग्राफिक इंटिमसी किंवा मग न्यूडीटी का दाखवली जात नाही असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर ऐश्वर्या म्हणाली की, मी अनेक चित्रपट केले पण मी कधीच तसे सीन्स केले नाही.

मी नक्की कोणासोबत बोलते?
पुढे बोलत असताना ऐश्वर्या म्हणाली की, मला न्यूडिटी दाखवण्यातही काहीच रस नाही. या वेळी पत्रकार, ऐश्वर्याला थांबवण्याचा देखील प्रयत्न करतो. त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते की, मला असं का वाटत आहे की मी एखाद्या स्त्रीरोग तज्ज्ञाशी बोलत आहे? एवढंच नाही तर ती म्हणाली की, मी नक्की कोणाशी बोलतेय? तुम्ही पत्रकारच आहात ना?, असा प्रश्न ऐश्वर्याने केला.

ऐश्वर्याचं कौतूक-
न्युडिटीबद्दल विचारल्या गेलेल्या प्रश्नाचं रोखठोक उत्तर दिल्याप्रकरणी नेटकऱ्यांनी ऐश्वर्याचं कौतुक केलं आहे. “ती बरोबर आहे. हे पत्रकार अभिनेत्यांना चित्रपटातील न्युडिटीबद्दल प्रश्न विचारतात का”, असा सवाल एकाने केला. तर ‘ऐश्वर्याने योग्य उत्तर दिलंय’, असं दुसऱ्याने म्हटलंय.

Post a Comment

0 Comments