बस मागे घेताना दुर्दैवी अपघात, वर्कशॉपमध्ये वाहक सिद्धेश्वर इंगळे यांचा जागीच मृत्यू


बार्शी|

 बस स्थानकाच्या वर्कशॉप मध्ये दि.१५ एप्रिल  संध्याकाळ ८.२० च्या दरम्यान मेंटेनन्स करता रॅम्पवर लावलेली एसटी बस मागे घेत असताना ड्युटीवर जाण्यासाठी वर्कशॉप मधील फिल्टर चे गार पाणी बाटलीमध्ये भरून नेण्यासाठी सतीश नारायण इंगळे वय ४२ वर्षे रा. येडशी (बार्शी आगार) यांचा एसटी बसच्या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. 

बार्शी बस स्थानकाच्या वर्कशॉप मध्ये मेंटेनन्स रॅम्प साठी जागा खूपच अपुरी असल्याने यापूर्वीही  छोटे-मोठे अपघात  बऱ्याच वेळा झाले आहेत, वास्तविक पाहता वर्कशॉप मध्ये गाडी रॅम्पवर घेतल्यानंतर ती पुढुन निघणे गरजेचे असते, पण बार्शी बस स्थानकाच्या वर्कशॉप मध्ये ती गाडी रिव्हर्सनी मागे घ्यावी लागते, यामुळे चालकाला रिव्हर्स घेताना जागा कमी असल्याने मागचा कसलाही अंदाज येत नाही, त्यामुळे याआधीही असे बरेच छोटे-मोठे अपघात झालेले असताना सुद्धा  मॅनेजमेंटकडून दखल का घेतली गेली नाही,  मॅनेजर काय करतात? असे प्रश्न  नागरिकांतून  विचारले जात आहेत.

Post a Comment

0 Comments