अभिजित पाटील व धवलसिंह मोहिते भाजपच्या वाटेवर? ; सुशीलकुमारांना प्रश्न ; पहा काय दिले उत्तर


लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना भारतीय जनता पार्टीने सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात काही डाव टाकत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अडचणीत आणले आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूरचे नेते विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांचा कारखाना एम एस सी बँकेने सील केला असल्याने अभिजीत पाटील व काँग्रेसमध्ये नाराज असलेले जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील भाजपच्या वाटेवर आहेत.

रविवारी काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने पंढरपूर या ठिकाणी वार्ताला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पत्रकारांनी धवलसिंह मोहिते पाटील आणि अभिजीत पाटील यांच्या संभाव्य भाजप प्रवेश बाबत शिंदे यांना प्रश्न उपस्थित केला.

लोकसभेची निवडणूक सुरू आहे अशामध्ये भाजप सुडाचे राजकारण खेळून आपल्याकडील यंत्रणेचा गैरवापर करीत आहे, अभिजीत पाटील व धवलसिंह मोहिते पाटील हे कोणत्या परिस्थितीमध्ये भाजपमध्ये जात आहेत हे महत्वाचे असून ही जनता जाणून असल्याचे ते म्हणाले.

Post a Comment

0 Comments