या टरबुजाचं करायचं काय उद्धव ठाकरे यांची सोलापुरात सडकून टीका



सोलापूर |

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सोलापुरात जाहीर सभा पार पडली. सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने उद्धव ठाकरेंची सोलापुरात जाहीर सभा पार पडली.

या सभेत उद्धव ठाकरेंनी भाजपवर सडकून टीका केली. “नकलीसेना बोलल्यानंतर मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सोडणार नाही. मोदी उद्या धाराशिवला येत आहेत. माझी मागणी आहे की, भवानी मातेच्या मंदिरात दर्शन घेऊन या. आजपर्यंत तुम्ही भवानी मातेचे दर्शन घेतले नाही. किमान नाव घ्या”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“तुम्ही बोलला नाहीत तर आमचे लोक समजून जातील आणि बोललात तर निवडणूक आयोगाला सांगा. शिवसेनेचा जेव्हा जन्म झाला तेव्हा मोदी हिमालयात किंवा रेल्वे स्टेशनवर असाल, शिवसेनाप्रमुखांनी तुमच्या कठीण काळात तुम्हाला वाचवले. अटल बिहारी तुम्हाला कचऱ्याच्या पेटीत टाकायला निघाले होते. शिवसेना सोबत होती म्हणून तुम्ही त्या तक्तावर बसला. आता सोबत नाही म्हणून तुम्ही बसू शकत नाही. बसू देणार नाही. संकटकाळी मदत करणाऱ्या शिवसेनेला नकली सेना म्हणता. भाजपची भेकड पार्टी झाली आहे. टरबुजाचे काय करायचं तुम्हाला माहिती आहे. जे टरबूज असते ते उन्हाळ्यात कामी येतं हे तसं नाही”, अशी खोचक टीका उद्धव ठाकरेंनी केली.

Post a Comment

0 Comments