धाराशिव |
शेतकऱ्यांची रोहित्र वारंवार जळत असल्याने नव्या रोहित्रची उभारणी करण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत असताना भाजपच्या आमदाराने नियम व कायद्याचा आधार घेत त्याची तक्रार केली, शेतकऱ्यांना वीज मिळणार नाही याची काळजी घेणारे हे लोकप्रतिनिधीना आता धडा शिकवण्याची वेळ आल्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यानी सांगितले. ते अपसिंगा (ता.तुळजापुर) येथील प्रचार सभेत बोलत होते.
यावेळी ओमराजे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी असतानाही फक्त विजेच्या अडचणीमुळे पाणी देत येत नव्हते. रोहीत्र वारंवार बिघडत असल्याच्या तक्रारी येत होत्या, तेव्हा आपण संबधित यंत्रणेला प्रक्रियेची वाट पाहु नका अशा सुचना केल्या. त्यामुळे तत्काळ अनेक ठिकाणी नवीन रोहित्र बसवण्यात आली. पण भाजपच्या आमदारास याचा त्रास झाला व त्यानी थेट तक्रार करीत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. साहजिकच अशा अधिकाऱ्याची चौकशी सूरु झाली. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी केलेल्या गोष्टीवर आक्षेप घेणाऱ्यांना आपण या निव़डणुकीत धडा शिकवा असे अवाहन खासदार ओमराजे यानी केले. कांद्याचे अनुदान जाहीर केले असले तरी जिल्ह्यात किती शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला हे देखील लक्षात ठेवुन त्याचाही हिशोब शेतकऱ्यांनी केला पाहिजे. कांद्याचे दर वाढले की, निर्यातबंदी करुन शेतकऱ्यांच्या कांद्याचे दर केंद्र सरकारने पाडले. एवढ मोठ नुकसान होऊनही आपण शांत राहयच का असा प्रश्न देखील ओमराजे यानी उपस्थित केला.
याप्रसंगी काँग्रेस जिल्हाध्यक्ष धिरज पाटील, राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार तालुकाध्यक्ष धैर्यशिल पाटील, अल्पसंख्याक जिल्हाप्रमुख अमीर शेख, युवक कॉग्रेस जिल्हा सरचिटणीस शितल गोरे, माजी सरपंच हिराचंद पाटील, माजी सरपंच रामदास गोरे, माजी उपसरपंच दिपक सोनवणे, चंद्रकांत नरुळे, गोपाळ गोरे, शरद जगदाळे, ऋषी मगर, दिग्वीजय पाटील, बालाजीराव बंडगर माजी जि. प.सदस्य, शरीफ शेख, बालाजी पांचाळ, ओंकार पवार, ऋषीकेश पाटील, सुरज गोलकर, ताजोद्दीन शेख, सुधीर कदम, पंचायत समिती माजी सभापती खराडे, सोमनाथ सगरी, माणीक पाटील, सिद्राम कारभारे, अर्जुन गोरे, दत्ता गोरे, माजीद भाई शेख, कुमार कदम, भुजंग नरवडे, यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, व नागरीक मोठया संख्येने उपस्थीत होते.
0 Comments