तरच आम्ही विठ्ठल कारखान्याला मदत करू फडणवीसांनी दिला शब्द
पंढरपूर |

राज्य सहकारी बॅंकेने केलेल्या कारवाईमुळे आर्थिक कचाट्यात अडकलेले विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी सोलापूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

विठ्ठल कारखान्याला मदत करण्याबाबत फडणवीस हे सकारात्मक असल्याचे दिसून आले. तसेच, तुम्ही आम्हाला मदत करा, आम्ही तुम्हाला मदत करू, असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे,' अशी माहिती अभिजित पाटील यांनी फडणवीसांच्या भेटीनंतर दिली.

राज्य सहकारी बॅंकेने 430 कोटी रुपयांच्या थकीत प्रकरणात विठ्ठल सहकारी साखर काखान्यावर जप्तीची कारवाई केली आहे. तीन गोदामेही सील केली आहेत. त्यामुळे अभिजित पाटील यांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांची भेट घेतली. त्या भेटीनंतर अभिजित पाटील हे माध्यमांशी बोलत होते.

Post a Comment

0 Comments