गळ्यात कवड्याची माळ घालून धाराशिवमध्ये नरेंद्र मोदी म्हणाले...


धाराशिव |

'महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानीला नमन करतो' असे मराठीतून म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धाराशिव येथील भाषणाची सुरुवात केली. आई तुळजा भवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी विजयी होण्याचे आशीर्वाद दिले होते आणि आज मी याच धर्तीवर जनता जनार्धन व आई तुळजा भवानीचे आशीर्वाद घेण्यासाठी येथे आलो आहे.

शक्तिशाली भारतासाठी आशीर्वाद विकसित भारतासाठी हवा असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिांची मने जिंकली.

या वेळी व्यासपीठावर आल्यानंतर पीएम मोदींचे स्वागत तुळजा भवानी मातेची मूर्ती, कवड्याची माळ व त्रिशूल देऊन धाराशिवच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी मोदी यांनी गळ्यातही कवड्याची माळ घालून संपूर्ण भाषण केले.

Post a Comment

0 Comments