धाराशिव लोकसभेसाठी अजित पवार गटाकडून अर्चना पाटील यांना उमेदवारीधाराशिव |

तुळजापूरचे भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ४ एप्रिल रोजी आज प्रवेश केला आहे.

अर्चना पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थित पक्षात प्रवेश केला. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांना धाराशिव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्या महायुतीच्या धाराशिव येथून अधिकृत उमेदवार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याव्यतिरिक्त खासदार सुनील तटकेर आणि रूपाली चाकणकर उपस्थित होते.

धाराशिवमध्ये अर्चना पाटील यांचा सामना शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निबांळकर यांच्यासोबत रंगणार आहे. अर्चना पाटील या धाराशिव जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आहे.

Post a Comment

0 Comments