भाजपचे माजी शहरप्रमुख प्रदिप मुंडे यांचा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश...!धाराशिव - भाजपचे माजी शहरप्रमुख तथा दोनवेळा नगरसेवक राहिलेले युवा नेते प्रदिप मुंडे यांनी उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधुन घेत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. 

युवा नेता म्हणुन शहरामध्ये त्यांची स्वतःची मोठी शक्ती असुन पक्षीय पातळीवर बदलत्या समीकरणानंतर काही दिवस ते शांत होते. गेले काही दिवस त्याना अनेक पक्षाकडुन ऑफर येत होत्या. पण त्यानी उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे. 

बुधवारी नांदेड येथे जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील यांच्या पुढाकाराने त्यानी हाती शिवबंधन बांधले. यामध्ये पंकज पाटील यांचीही उपस्थिती होती. सत्ताकाळात कोणीही प्रवाहाबरोबर जाण्याचा प्रयत्न करेल मात्र लोकशाही वाचविण्यासाठी उध्दव ठाकरे यानी सूरु केलेला लढा हा मला अधिक महत्वाचा वाटत आहे.

 शिवाय जिल्ह्यातील खासदार ओमराजे व आमदार कैलास पाटील यांनी निष्टेचे जे उदाहरण सर्वासमोर ठेवले त्यांना बळ देण्यासाठी आपण काम करणार असल्याचे प्रदिप मुंडे यानी सांगितले.

Post a Comment

0 Comments