...अन् अण्णा डॉक्टर झाला



प्रशांत पाटील यांना शिवाजी विद्यापीठाने दोन दिवसापूर्वी डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पदवीने गौरवण्यात आले, अण्णा डॉक्टर झाल्यानं मनस्वी आनंद झाला. आपल्या कामाशी अत्यंत प्रामाणिक असणारा माणूस म्हणजे अण्णा, स्वाभिमानाने जीवन जगणारा माणूस अण्णाच्या पीएचडीच्या कोरोना काळातील संघर्ष आठवला की शिक्षणाविषयी चीड येऊ लागते. पीएचडी करायची की नाही इथपासून सुरू झालेला प्रवास मध्यंतरी पीएचडी थांबवलेलं काम असा सगळा प्रवास डोळ्यासमोरून झरझर पुढे आला.

उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी पैशाची आवश्यकता असते, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची शिष्यवृत्ती नाही. आयुष्यातली ऐन उमेदीची पाच सात वर्षे घालवणं म्हणजे मोठं कठीण काम. अण्णाच्या घरची परिस्थिती जरी चांगली असली तरी त्यांनाही अनेक वेळा आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला. सीएसबीवर प्राध्यापक म्हणून काम करताना वर्षातून एकदा मिळणारा तुटपुंजा पगार ही सर्व लिलया या माणसानं पार पाडली.

इतिहास विषयाला प्रशांत पाटील यांच्या रूपाने नवा संशोधक मिळाला यामध्ये तीळ मात्र शंका नाही. अण्णा कडे इतिहास विषयातील सेट,, बीएड, एमएड व विविध कोर्सेस च्या पदविका अभ्यासक्रम आहेत. आपल्या कामाविषयी अत्यंत निष्ठा ठेवणारा माणूस पण कुठल्याही खच्चीकरण करणाऱ्या प्रसंगापुढे हतबल न होता पुढे सरसावण्याची वृत्ती असल्याने अण्णाचा निभाव आहे. येणारा काळ आपलाच असेल या आशेवरती माणूस जगतो हेच खरं. अण्णा पुढील वाटचालीसाठी आपणास खुप सार्‍या शुभेच्छा...

Post a Comment

0 Comments