सुप्रिया सुळे यांना धक्का, प्रचार प्रमुखांनी सोडली साथ


इंदापूर तालुक्यात खासदार सुप्रिया सुळे यांचे प्रचार प्रमुख असलेले पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती प्रविण माने यांनी सुप्रिया सुळे यांची साथ सोडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी महायुतीच्या बारामती लोकसभा उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी मोहोळचे आमदार यशवंत माने यांच्या समवेत रिंगणात उतरले आहेत. काही दिवसांपूर्वी घड्याळापेक्षा तुतारी भारी व तुतारीचा आवाज दिल्लीत घुमवू असे आवाहन करून सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराला सुरुवात केलेले प्रविण माने यांनी आज सुप्रिया सुळे यांची साथ सोडून विकासाला साथ म्हणून अजित पवार यांना साथ दिली आहे. त्यांनी आता सुनेत्रा पवार यांचा प्रचार सुरू केला आहे.

Post a Comment

0 Comments