रवीना टंडनच्या लेकीचं मलायकाच्या लेकाशी जुळलं सूत!, रिलेशनशीपबाबत रवीनाचा लेकीला हा मोठा सल्लामनोरंजनसृष्टीमध्ये स्टारकिड्सपासून ते सुपरस्टारपर्यंत अभिनेते अभिनेत्री यांच्यात अफेयर्सची चर्चा सुरू असते. तर काही अभिनेते अभिनेत्री विवाह करत असतात. त्यांच्या वैयक्तिक कराणाने पुन्हा घटस्पोट देखील घेतात. पुन्हा रिलेशनशीपमध्ये येतात. हे सऱ्हास सुरू असतं. गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये अभिनेत्री मलायका अरोराने तिच्या घटस्फोटाला घेऊन तसेच अर्जुन कपूरच्या रिलेशनशीपला घेऊन ती चर्चेत होती. मात्र आता तिचा मुलगा अरहान आणि रवीना टंडनच्या  मुलीच्या रिलेशनशीपला घेऊन चर्चा आहेत.

रवीना टंडनने आपला 90 चा काळ आपल्या अभिनयाने, आपल्या डान्सने तसेच तिच्या सैंदर्याने गाजवला आहे. काम एका बाजूनं आणि आपले मातृतूल्य एका बाजूला पाहायला मिळते. आपल्या पाल्याला योग्यवेळी योग्य तो निर्णय घेण्याबाबत रवीनाने भाष्य केलं आहे.  मलायकाचा मुलगा अरहान आणि रवीना टंडनची मुलगी राशा थडानी यांच्या रिलेशनशीपला घेऊन चर्चा आहे.

राशा ही बॉलिवू़डमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे. स्टारकिड्सप्रमाणे राशाच्या डेटिंगच्या चर्चा सुरू आहेत. अरहान आणि राशाच्या रिलेशनशीपवर रवीनाने लेकीला एक प्रेमळ आणि योग्य मार्ग दाखवणारा सल्ला दिला आहे.  राशाच्या रिलेशनशीपला रवीनाने विरोध केला आहे. रवीनाने नुकतीच एक मुलाखत दिली त्यामध्ये तिने आपल्या मुलीच्या रिलेशनशीपवर भाष्य केलंय. 

रवीना टंडन काय म्हणाली?
“आता तरी तिने सध्या तिच्या करिअरकडे आणि अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत करावं. एका व्यक्तीला तिच्या आयुष्यामध्ये प्रॉक्टिकल असणं गरजेचं असतं. प्रेमात पडण्याची ही योग्य वेळ नाही. एक योग्य जोडीदार भेटण्यासाठी अनेकांना भेटावं लागतं. कोणत्याही नात्यात घाई करून चालणार नाही.” रवीनासोबत अरहानचं नातं योग्य नसल्याचं म्हटलं जात आहे.

रवीनाचा लेकीला सल्ला
“मी माझ्या मुलीला सांगी इच्छिते की तिनं स्वत:ला वेळ द्यावा. या गोष्टींसाठी आणखी वेळ घ्यावा. घाई करू नये. मुलींना वाटतं की लग्न करणं खूप फनी असतं. मेहंदी लावू, चांगले कपडे, मज्जा करु. पण विवाह करणे म्हणजे मज्जा नाही तर ती एक कमीटमेंट असते. योग्य वेळ आणि विचार करून तिने निर्णय घ्यावा,” असं रवीना टंडन म्हणाली.

Post a Comment

0 Comments