बार्शी |
शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार ओम राजेनिंबाळकर यांनी AB फॉर्म घेतला. उद्या 16 एप्रिल रोजी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी, मनात एकच होते की अनेक गद्दार गेले तरी आपण खुद्दारी जोपासली व हा AB फॉर्म म्हणजे त्याच निष्ठेचे फळ होय, असे ओमराजे यांनी म्हटले.
लोक रात्रीतून पक्ष प्रवेश करून सकाळी उमेदवारी मिळवतात. पण आम्ही ना पक्ष बदलला ना निष्ठा त्यामुळे जनतेशी इमान राखून निवडणूक लढत आहे, असेही त्यांनी म्हटले.
,
0 Comments