बार्शीतील वाईन शॉपचा परवाना १५ दिवसांसाठी निलंबित



बार्शी - आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दारूविक्रीवर शासनाने नियंत्रण आणि वॉच ठेवल्याचे दिसून येते. त्याच, माध्यमातून बार्शी येथील एस. पी. वाईन्स हा वाईन शॉप परवाना १५ दिवसासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी निलंबित केला आहे. 17 मार्च रोजी झालेल्या विक्रीत आणि नोंदवहीत अनियमितता आढळून आल्याने राज्य उत्पादन विभागाने ही कारवाई केली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्ह्यातील सर्व वाईन शॉप, देशी दारू दुकाने, परमिट रूम व बियर शॉपी यांचेकडून दैनंदिन दारू विक्रीचा अहवाल मागविण्यात येतो. जिल्हाभरातील दारू दुकानाकडून प्राप्त झालेल्या दारुविक्रीच्या आकड्यांची तपासणी केली असता बार्शी येथील चंद्रकांत पिसे यांच्या नावे असलेल्या एस. पी. वाईन्स या दुकानाचे व्यवहार १५ दिवसांकरिता निलंबित करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे जिल्ह्यातील मद्यविक्री दुकांदारांचे धाबे दणाणले आहेत.


Post a Comment

0 Comments