टेंभुर्णीतील भाजीविक्रेत्यावर बंदुकीने गोळीबार व कोयत्याने हल्ला


माढा |

माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील भाजी विक्रेत्यावर अज्ञात तिघांनी बंदुका व कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. राहूल महादेव पवार (वय ३६ रा.महादेव गल्ली, मिर्ची बाजार) असे गंभीर जखमी तरूणाचे नाव आहे.

दरम्यान, सोलापूर - पुणे महामार्गावर जगदंबा गुजराती थाळी शेजारी राहुल पवार यांचा भाजी विक्रीचा व्यवसाय असून जेवण करण्यासाठी दुकान बंद केले होते. भाजी दुकान उघडून ते आपल्या दुकानात बसले होते. चार चाकी वाहनातून अज्ञात चौघांनी जीवघेणा हल्ला करण्याचा दृष्टीने पवार यांच्या जगदंबा फ्रूट व भाजी दुकानासमोर कार लावून त्यातील तिघांनी हातात गावठी पिस्तूल बंदुक व कोयता घेऊन आत दुकानात उड्या मारून हल्ला केला. यामध्ये झटापटीत पवार यांच्या मांडीत गोळी घुसली असून डोक्यात कोयत्याने वार करण्यात आले आहेत. घटना घडताच आरोपींनी तेथून पलायन केले. जखमी पवार यास येथील मार्स हॉस्पिटल येथे उपचार चालू आहेत.

Post a Comment

0 Comments