आभाळ कवेत घेतलेल्या भीष्म पितामह यांच्या भेटीने भारावून गेलो आहे - निलेश मुद्दे

 बार्शी |

पत्रकारिता क्षेत्रातील भीष्म पितामह राजा माने यांनी बार्शीतील कामगार चळवळीतील फरिश्ता निलेश मुद्दे यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी कामगारांच्या अडी - अडचणी जाणून घेऊन सर्वोतोपरी मदत करण्याचे वचन दिले.

यावेळी बोलताना राजा माने म्हणाले कि, "कामगार वर्ग हाच माजा कुटुंब आहे, तुम्ही सर्व आई, वडील, भाऊ, बहीण आहात. मी तुमचा सर्वांचा मोठा मुलगा म्हणून मी कुटुंब प्रमुख म्हणून आपल्या सर्वांचं काम करत असताना मी नेहमी आपली कामं सोप्या पद्धतीने व्हावीत म्हणून सर्वांना आपल्या कामानिमित्त भेटत असतो" अश्या प्रकारची प्रतिक्रिया राजे माने यांनी व्यक्त केली आहे.

तेजस्वी ऊर्जा घेऊन काळाच्या कपाळावर इतिहास कोरायची जिद्द बाळगून, निष्ठेची विचार घेऊन 'डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना' महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष आणि 'फ्री प्रेस जर्नल व दैनिक नवशक्तीचे समूह राजकीय संपादक' रणक्षेत्र गाजवणारे परखड विचार आणि झुंजार व्यक्तिमत्व म्हणजे राजा माने यांची भेट मनाला समृद्ध करून गेली. ही भेट स्नेहील ऋणानुबंधाची व कौटुंबिक जिव्हाळ्याची होती. या भेटीने काळजातल्या वातीचं बळ जागवलं. या भेटीत कठोर, कठीण आक्रमक आणि जहाल विचारांच्या तळाशी नितळ मनाची करुणाघन श्रीमंती अनुभवली. कामगार बाबत तळमळीचे विचारांची मशाल प्रज्वलित ठेवण्यासाठी बळ मिळालं असल्याचं मत कामगार चळवळीतील तारा निलेश मुद्दे यांनी व्यक्त केले आहे.

Post a Comment

0 Comments