कांदलगांव चे सुपूञ डॉ. भाऊसाहेब नवले यांना महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान



बार्शी - राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधिने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सात्रळ येथील हिंदी विभागाचे प्रमुख आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पीएच.डी. चे संशोधक मार्गदर्शक आणि बार्शी तालुक्यातील कांदलगांवचे सुपुत्र डॉ. भाऊसाहेब नवनाथ नवले यांना महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा पं. महावीर प्रसाद द्विवेदी स्वर्ण पुरस्कार प्राप्त झाला आहे. 

 हिंदी भाषा संबंधी लेखनासाठी अकादमीच्या वतीने डॉ. नवले यांच्या ‘वैश्वीकरण और हिंदी का रोजगारोन्मुख परिदृश्य’ या पुस्तकास हा बहुमान मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा सन २०२३-२४ या वर्षाचा पुरस्कार सोहळा नुकताच चर्चगेट, मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी चे कार्याध्यक्ष डॉ. शीतला प्रसाद दुबे यांच्या हस्ते आणि अकादमीचे ज्येष्ठ सदस्य डॉ. सुधाकर मिश्र अकादमीच्या उपाध्यक्ष डॉ. मंजू लोढा यांच्या उपस्थित डॉ. भाऊसाहेब नवले यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ३५ हजार रोख रक्कम, सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. दरवर्षी विविध साहित्य प्रकारातून अकादमी च्या माध्यमातून हिंदी भाषा आणि साहित्याच्या प्रचार-प्रसारासाठी हे पुरस्कार दिले जातात. 

डॉ. नवले यांची आतापर्यंत तीन पुस्तके प्रकाशित तर डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या ‘विचार तर कराल’ या पुस्तकाचे त्यांनी ‘सोचिए तो सही’ या शीर्षकाने हिंदीत भाषांतर झाले आहे. विविध संशोधन मासिकाच्या विशेषांकाचे संपादक म्हणून ही डॉ. नवले यांनी काम पाहिले आहे. विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे दोन संशोधन प्रकल्प डॉ. नवले यांनी पूर्ण केले आहेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय संशोधन पत्रिकेतून त्यांचे ७९ पेक्षा जास्त संशोधन लेख प्रकाशित झाले आहेत. डॉ. नवले यांनी शैक्षणिक योगदानाबरोबरच वर्ष २०१८ पासून २०२१ पर्यंत संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कोल्हार आणि सात्रळ येथे उप-प्राचार्य आणि महाविद्यालय परीक्षा अधिकारी म्हणून ही प्रशासनिक कामकाज पाहिले आहे. त्यांना हिंदी अकादमी, मुंबई या संस्थेचा साहित्यातील मातृभूमि भूषण सम्मान आणि ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेचा उत्कृष्ट हिंदी अध्यापन पुरस्कार ही प्राप्त झाले आहेत.

महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री. ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री श्री. आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, प्रवरा इंस्टिट्यूट ऑफ़ मेडिकल सायन्सेस, लोणी चे कुलपति व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. राजेंद्र विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे सहसचिव श्री. भारत घोगरे पाटील, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, अतांत्रिक विभागाचे शिक्षण संचालक प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे व कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सात्रळ चे प्राचार्य प्रो. डॉ. प्रभाकर डोंगरे, उप प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उप-परिसर समिती सदस्य डॉ. जयश्री सिनगर, उप प्राचार्य डॉ. दीपक घोलप यांचे सह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आणि पुढील लेखकीय कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments