विकासकामांसाठी १६८ कोटींचा निधी मंजूर - आमदार राजेंद्र राऊतबार्शी|

आमदार राजेंद्र राऊत यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे बार्शी नगरपालिकेला केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून १६८ कोटी ७९ लाख निधी मंजूर केला आहे. महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत पोस्ट ऑफिस चौक ते कुर्डवाडी रोड(जैन मंदिर) व पोस्ट ऑफिस चौक ते जामगाव रोड(लातुर रोड) बार्शी नगरपालिका हद्दीतील रस्ता सिमेंट काँक्रीट करणे यासाठी ९२ कोटी ५४ लाख,केंद्र शासनाच्या विशेष सहाय्यता निधी अंतर्गत १ ते ६ डी.पी.रोड करणे यासाठी ३२ कोटी,माझी वसुंधरा अभियान अंतर्गत ५ कोटी,जिल्हास्तर नगरोत्थान योजनेअंतर्गत १० कोटी ५० लाख,नागरी दलितेत्तर योजनेअंतर्गत २ कोटी २५ कोटी,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत ६ कोटी ५० लाख,वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत ११ रस्त्यासाठी २० कोटी असे एकूण १६८ कोटी ७९ लाख मंजूर करण्यात आले आहेत.


Post a Comment

0 Comments