महामानव बहुउद्देशिय सामाजिक संस्थेकडून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरीबार्शी : तालुक्यातील गुळपोळी येथील महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.  कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गुळपोळी गांवचे ग्रामपंचायत सदस्य कृष्णा चौधरी तर कार्यक्रमाचे अध्यक्ष अतुल चौधरी तर प्रमुख उपस्थिती  समाधान चौधरी होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रथिमेला पुष्पहार ग्रामपंचायत सदस्य कृष्णा चौधरी यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.

 महापुरुषांची पुस्तके देऊन विविध मान्यवरांचे सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आले. त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष भैरवनाथ चौधरी , किरण खुरंगळे , समाधान चौधरी , कृष्णा चौधरी, रणजीत चौधरी, अतुल चौधरी,सुनिल चौधरी, राजरत्न शिंदे , सोहम लोंढे, मोहन चौधरी, इत्यादि मान्यवर संस्थेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.  प्रमुख पाहुणे अध्यक्ष विविध मान्यवारांनी मनोगत व्यक्त केली. सूत्रसंचालन किरण खुरंगळे तर कार्यक्रमाची प्रस्तावना, आभारप्रदर्शन भैरवनाथ चौधरी यांनी केले.

Post a Comment

0 Comments