बार्शीत भूमी अभिलेख कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशाराबार्शी - भूमि अभिलेख कार्यालयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतजमीनीची मोजणी करण्यात येते. मात्र, आताची मोजणी पद्धत क्लिष्ट असून यात सुधारणा करण्यात यावी अन्यथा भूमी अभिलेख कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

बार्शी तालुक्यातील शेतकरी भरत आवटे गेली अनेकवर्षं याबाबत पाठपुरावा करत आहेत. सध्या शेतजमिनीला सोन्याचा भाव आहे. एक एक गुंठ्याला महत्व प्राप्त झालं आहे. अशा परिस्थितीत शेतजमीन योग्य पध्दतीने मोजून मिळणं आवश्यक आहे. शेतजमीनीचं मोजमाप हे व्यावहारिक पद्धतीने चालणाऱ्या मापकात मिळायला हवीत. मीटर, फूट या मापकमध्ये मोजमाप मिळाल्यास शेतकऱ्यांना समजायला सोपं होईल आणि न्याय मिळेल, असे भरत आवटे यांचं म्हणणं आहे.

#याबाबत त्यांनी भूमिअभिलेख कार्यालय, जिल्हाधिकारी, सचिव, मंत्रायलायपर्यंत तसेच मुख्यमंत्री, आमदार, खासदार यांनाही पत्रव्यवहार केला आहे. मात्र अद्याप त्याबाबत कोणीही  दखल घेतलेली नाही. यासाठी बार्शी तालुक्यातील सर्व शेतकरी बार्शी भूमिअभिलेख कार्यालयावर 20 फेब्रुवारी रोजी मोर्चा काढणार असून कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.


Post a Comment

0 Comments