आश्वासन पाळा अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन - शंकर गायकवाड



बार्शी |

 दि.15 फेब्रुवारी 2024, पुणे येथील ओरिएंटल पिकविमा कंपनीच्या राज्यस्तरीय कार्यालयामध्ये शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी घेराव आंदोलन केले त्यावेळी दयानंद चौधरी, संतोष पाटील, सुभाष चौधरी, अमोल भोसले, मधुकर चौधरी, महादेव चौधरी, राहुल आगलावे, बाळासाहेब भायगुडे, कल्याण चौधरी, अमर चौधरी, रितेश तानवडे, सचिन आगलावे, प्रवीण चौधरी, भारत चौधरी, वैभव गादेकर, प्रमोद चौधरी, राजेंद्र फरताडे, सुशांत चौधरी, सुरेश चौधरी, श्रीहरी गायकवाड, मधुकर पाटील, सिद्धू चौधरी, बारीकराव चौधरी, मुन्ना गवळी, रमेश चौधरी, राजेंद्र चौधरी, बालाजी चौधरी आदीसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.  
   
 राज्यातील ज्या शेतकऱ्यांना पिक विम्याची कमी नुकसान भरपाई मिळाली किंवा काहीच मिळाली नाही अशा उर्वरित सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विम्याची नुकसान भरपाई तात्काळ बँक खात्यावर जमा करा या प्रमुख मागणीसाठी हे घेराव आंदोलन करण्यात आल्याचे सांगून दिलेल्या लेखी आश्वासनाप्रमाणे राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या रकमा विमा कंपनीने जमा कराव्यात अन्यथा पुन्हा कोणतीही पूर्वसूचना न देता तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा खणखणीत इशारा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिला. ओरिएंटल पिक विमा कंपनीचे राज्य समन्वयक श्री विनायक दीक्षित यांनी मागण्याचे निवेदन स्वीकारून लेखी आश्वासन दिल्यानंतरच हे आंदोलन मागे घेण्यात आले.

Post a Comment

0 Comments