धक्कादायक ! तरुणाचा मामाच्या पोरीवर जडला जीव



एकतर्फी प्रेमातून दिल्लीत वजिराबाद इथं एका २३ वर्षांच्या तरुणाला तरुणीच्या कुटुंबीयांनी जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडलीय. यात तरुणाचा मृत्यू झाला असून पोलिसांनी या प्रकरणी कारवाई सुरू केली आहे. तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं होतं पण दोन दिवस उपचारानंतर त्याचा मृत्यू झाला. मृत्यू आधी त्याने जबाबा देताना आरोप केला की , मामाच्या मुलीने पेट्रोल टाकून जाळलं.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वजिराबादमध्ये राहणाऱ्या मोहम्मद नौमान याचं मामाच्याच मुलीवर प्रेम होतो. नौमानच्या कुटुंबियांनी दावा केला आहे की, दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं आणि दोघेही लग्न करणार होते. मात्र तरुणीच्या कुटुंबियांनी नकार दिला. त्यानंतर तरुणीने नौमानला घरी बोलावलं आणि जिवंत जाळलं. दरम्यान, तरुणीच्या कुटुंबियांनी हे आरोप फेटाळले असून नौमाननेच घरी येऊन स्वत:ला पेटवून घेतल्याचं म्हटलंय.


Post a Comment

0 Comments