महाराष्ट्र विद्यालय बार्शी याठिकाणी विविध स्पर्धा संपन्न


बार्शी|

कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांच्या १२१ व्या जयंतीनिमित्त संस्था अंतर्गत माध्यमिक गटाच्या विविध स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र विद्यालय बार्शी यांनी केले होते.या स्पर्धा १ व २ जानेवारी २०२४ दरम्यान घेण्यात आल्या होत्या. प्रथम १ जानेवारी रोजी वक्तृत्व, निबंध, हस्ताक्षर, रांगोळी, चित्रकला या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे कार्यकारिणी सदस्य श्री व्ही एस पाटील व संस्था तथा शाळा समिती सदस्य श्री बी के भालके यांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेची पूजन करून केले.
 २ जानेवारी २०२४ रोजी गीत गायन व लघुनाटीका या स्पर्धा संत तुकाराम हॉल या ठिकाणी पार पडल्या. बक्षीस वितरण समारंभच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्था अध्यक्ष डॉ.बी.वाय.यादव तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री जयकुमार शितोळे हे होते सोबत संस्था ट्रस्टी डॉ. सी.एस. मोरे ,संस्था तथा शाळा समिती सदस्य श्री बी के भालके, श्री आप्पासाहेब भोसले, महाराष्ट्र विद्यालयाचे प्राचार्या के.डी.धावणे,मुख्याध्यापक आर.बी.सपताळे, पर्यवेक्षक एस.सी. महामुनी,प्रा.किरण गाढवे उपस्थित होते. प्रथम छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे  प्राचार्या के.डी.धावणे यांनी केले. वरील घेण्यात आलेल्या सर्व स्पर्धेमधून प्रत्येकी तीन क्रमांक काढण्यात आले या सर्व विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे

 वक्तृत्व स्पर्धा प्रथम क्रमांक कु.हत्ताळे अमूल्या नागनाथ,द्वितीय क्रमांक कु.पाटील आदिती रवींद्र व तृतीय क्रमांक चि.दाभाडे श्रेयश शिवाजी  निबंध स्पर्धा प्रथम क्रमांक कु.अनूजा सचिन छबिले ,द्वितीय क्रमांक कु. नम्रता कल्याण नलवडे व तृतीय क्रमांक कु.भारती गणेश ढावारेहस्ताक्षर स्पर्धा प्रथम क्रमांक कु.काळे सायली अनिरुद्ध ,द्वितीय क्रमांक चि.देशमुख वैभव सचिन व तृतीय क्रमांक कु.पटेल तंजीला सलामत

चित्रकला स्पर्धा प्रथम क्रमांक कु.बुरांडे कमिया सचिन, द्वितीय क्रमांक चि. हत्ताळे अश्वथ नागनाथ व तृतीय क्रमांक कु वाघमोडे धनश्री सर्जेराव रांगोळी स्पर्धा प्रथम क्रमांक कु.कापसे साक्षी विकास, द्वितीय क्रमांक कु.वहिल पुजा सोमनाथ व तृतीय क्रमांक कु.जगदाळे सुप्रिया बळीराम 

 गीत गायन स्पर्धा प्रथम क्रमांक महाराष्ट्र विद्यालय बार्शी, द्वितीय क्रमांक जिजामाता कन्या प्रशाला बार्शी व तृतीय क्रमांक किसान कामगार विद्यालय उपळाई (ठों)लघुनाटीका स्पर्धा प्रथम क्रमांक किसान कामगार विद्यालय उपळाई (ठों), द्वितीय क्रमांक जिजामाता कन्या प्रशाला बार्शी व तृतीय क्रमांक महाराष्ट्र विद्यालय बार्शी 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.जे. एम.तांबोळी, श्री.के.जी.मदने व श्री. एस.एल. देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती डी.एम. वायकुळे यांनी केले. या यशाबद्दल सर्वांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी.वाय.यादव, उपाध्यक्ष एन.एन.जगदाळे,सचिव पी.टी. पाटील, सहसचिव ए.पी.देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, सर्व कार्यकारिणी सदस्य,सर्व संस्था सदस्य तथा शाळा समिती सदस्य बी.के. भालके,महाराष्ट्र विद्यालयाचे प्राचार्या के.डी.धावणे, उपमुख्याध्यापक आर.बी.सपताळे, पर्यवेक्षक एस.सी.महामुनी,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments