जी ओ एच या खडतर सायकल स्पर्धेत (२०२४) सुरज मुंढेचे प्रथम प्रयत्नात नेत्रदिपक यश !


भारतात सर्वात खडतर मानली जाणारी जि ओ एच (गेट्स ॲाफ हेवन) ही १२०० कि.मी. ची एलआर यम (दर चार वर्षानंतर बैंगलुरू रॅडुनिअर्स आयोजित करते). या वर्षीची एल आर यम दि. २४ ते २७ जानेवारी २०२४ दरम्यान पार पडली. यामध्ये बार्शी येथे आपले शिक्षण पुर्ण करुन हल्ली पुणे येथे स्थायिक असलेले सुरज मुंढे यांनी हा खडतर प्रवास प्रथम प्रयत्नांत ८९ तांस व ४५ मिनिटांत यशस्वीपणे पुर्ण केला.
 
 याचा मार्ग कर्नाटक, तामिळनाडु व केरळ या तीन राज्यातुन होता. या ईव्हेंट साठी भारतातील विविध राज्यातुन १०१ सायकलपटुंनी आपला सहभाग नोंदविला होता. हे आव्हान पार पाडण्यासाठी सायकलपटुंना उन, वारा, धुकं, थंडी, सतत चढ-उतार, आहार व झोपेवर नियंत्रण ठेवत स्वताःला सिद्ध करायचे होते. दक्षिण भारतातील खडतर मानले जाणारे प्रामुख्याने येरकाड, कुन्नुर, दोडाबेट्टा-ऊटी, कलपेट्टा, ईरिट्टी, सकलेशपुर व चिकमंगलूरू असे विविध १४० कि.मी. चे घाट व हेअरपीन बेंड सर करायचे होते.

 या ईव्हेंटचे वैशिष्ठ म्हणजे जवळपास ५०% मार्ग हा घणदाट जंगलातून, पश्चिम घाटातील दर्या-खेर्यांच्या भव्य रांगा, निसर्गरम्य वातावरणा व एकुण १४००० मिटर्सचे ईलेव्हेशन पार करायचे होते. धाराशीव जिल्ह्यातून पहिला जिओएच फिनिशर होण्याचा मान मिळवला. सुरजने आपल्या यशाचे श्रेय त्याचे प्रशिक्षक, आपले कुटुंब व सहयेगी मित्रांना दिले.

Post a Comment

0 Comments