वाकीघोलसोबत काळम्मावाडी धरणग्रस्त बांधवांना खऱ्या अर्थाने न्याय देणारं पाणीपूजन


३५- ४० वर्षांपूर्वी काळम्मावाडी प्रकल्प झाला आणि या दूधगंगा नदीवर स्थिरावलेली आमची २९ गावं विस्थापित झाली. या धरणाचा उगम म्हणजे काळाम्मादेवीच मंदिर आणि वाकीघोलच्या डोंगर कपारीतून येणार 'निखळ पाणी' ज्यानं अनेक कोल्हापूरवासियांच्या जगण्याला खऱ्या अर्थाने बळ दिलं.  या 28 TMC धरणावर कोल्हापूरचा प्रत्येक माणूस सुखावला. आज या धरणातून निघणाऱ्या पाण्यात कैक पट जमीन ओलिताखाली आली. येथील प्रत्येक शेतकरी आर्थिक दृष्टया सक्षम आणि स्वावलंबी बनला.  आज याच धरणाच्या माध्यमातून कोल्हापूर साठी थेट पाईपलाईनमधून पुरेस पाणी मिळालं.
   
पण याचं नाण्याची एक दुसरी आणि उपेक्षीत बाजू देखील आहे. आज कोल्हापूरची तहान या काळाम्मावाडी धरणातून जरी भागवली गेली असली तरी त्यासाठी स्वतःचा संसार आहे तसा उघड्यावर टाकून उपर जगणं जगणाऱ्या धरणग्रस्ताला यातून काय मिळालं याकडे मानवतावादी नजरेतून पाहणं देखील गरजेचं आहे.  या 29 वड्यावस्त्यानी "आपल भरलेलं कुटुंब, निस्वार्थी गावं, पूर्वापार वडिलोपार्जित प्राणपणाने जपलेली जमीन, निसर्गाशी जोडलेली नाळ, इथल्या रानावणातल्या पायवाटा, ढोर- गुर, वाकीच्या सनिध्यातल रांगडेपणाच जगणं" हे सगळ जसच्या तस जिथल्या तिथं नाईलाजास्तव सोडून दिलं.  आणि याबदल्यात आम्हाला मिळालं काय तर उपरेपणाच, गुलामगिरीतल जगणं... आज याघडीला कटू असल तरी हेच सत्य आहे...

   एकीकडे या व्यवस्थेन एका वर्गाला सुजलाम सुफलाम बनवलं तर याचा परिणाम दुसरीकडे मात्र एका अल्पसंख्य वर्गाला आपलं स्वाभिमानाचा जगणं सोडून लाचारीच जगणं स्वीकारावं लागलं, हे त्या धरणग्रस्तांचा दुर्दैव... अजूनही कित्तेक प्रकरणामध्ये शासनाने कागदोपत्री जमिनी वाटप करूनही धरणग्रस्तांना स्थानिक जमीनदार जमिनीचा ताबा घेऊ देत नाहित, तिथे त्यांना अरेरावीची, दांडगाईची भाषा वापरून कोर्ट-कचेरीच्या फेऱ्यात ढकलल जात.
  
आज या गोष्टींची आठवण होण्याचं निमित्त म्हणजे या काळम्मावाडीचा धरणाचा  दुसरा आणि सध्या तिथेच स्थायिक असलेला वाकिघोल (उर्वरित १४ वाड्या) भागात, काल आमदार साहेबांच्या माध्यमातून या वकिघोलवासियांच्या जमिनी सुपीक बनवण्यासाठी केलेलं केटीवेअरच पाणीपूजन. याचं वकिघोलमधून दुथडी भरून पाणी धरणात आणल जायचं, आणि पुढं याचं वितरण कोल्हापूर साथी व्हायचं, पण प्रत्यक्षात उगमस्थान असलेला वाकिघोल मात्र यापासून वंचित होता.  या पाणीपुजनामुळे मात्र धरणग्रस्त बांधवांच्या जखमेवर सुखद फुंकर मारण्याचं सत्कार्य आज आमदार साहेबांनी केलंय. यामुळे वकिघोलातील शेतकरी नक्कीच सुखावला जाईल. 

 
या पाणीपुजनाच्या वेळी वकिघोलच्या जनतेकडून लोकराजा राजर्षी शाहूंच्या विचारांचा वारसा आबिटकर साहेबांनी असाच पुढे चालवण्यासाठी त्यांना शाहूंची प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान केला...
  पाणीदार आमदार असलेल्या आबिटकर साहेबांच्या माध्यमातून चाललेली ही पाणी वाटपाची शृंखला इथेच थांबणार नाही, तर येणाऱ्या काळात कामतेवाडी प्रकल्प, दुबळेवाडी प्रकल्प मार्गी लावूनच या पाणी शृंखलेची समाप्ती होइल, अन् पूर्ण वाकिघोल खऱ्या अर्थाने स्वावलंबी होईल, ही आशा व्यक्त करतो.  


         श्री. सुनिल दळवी
            (वकिघोलकर)
           ९८८१४८५१६५

Post a Comment

0 Comments