मुख्याधिकारी पाटील यांनी केली वैराग शहराची पाहणी, बसपाच्या निवेदनाची दखल


वैराग |

बहुजन समाज पार्टी बार्शी विधानसभेमधील वैराग नगरपंचायतच्या कार्यकारी मुख्याधिकारी पाटील यांना बहुजन समाज पार्टी शहराच्यावतीने यापूर्वी निवेदन देण्यात आलेले होते, याचाच भाग म्हणून मुख्याधिकारी पाटील यांनी वैराग शहराची पाहणीही केली होती.

संबंधित कर्मचाऱ्यांना निवेदनाच्या अनुषंगाने सूचनाही करण्यात आलेले होत्या, त्यामध्ये गटार साफ करणे पथदिवे लावले व स्वच्छता करणे नवीन रस्त्याची निर्मिती व रस्ता दुरुस्ती करणे अशा प्रकारची नियोजन देण्यात आलेले होते. परंतु मुख्याधिकारी पाटील  पहाणी तर केली व थोड्या प्रमाणात कामही केले परंतु ते काम नाममात्र असल्याचे सांगण्यासाठी वैराग शहराचे शहराध्यक्ष ताजोद्दीन  (बाबा ) शेख यांनी माननीय पाटील मॅडम यांची भेट घेऊन त्यांना नवीन वर्षाच्या व शौर्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments