बार्शी | काळवीटाची शिकार करणाऱ्या दोघानां अटक..



बार्शी  : तालुक्यातील घोळवेवाडी येथील वन विभागाच्यां जवळ असणाऱ्या शेतात कोणीतरी काळवीटाची शिकार करून त्याचे मास शिजवत आहे अशी गुप्त माहिती समजल्यामुळे  वन विभागाचे पथक तेथे गेले असता त्या ठिकाणी मृत काळवीटाचे शरीरा पासुन वेगळे केलेले मुंडके, डोके ,पायाचे तुकडे व तसेच पातेल्या मध्ये शिजवलेले मटण आढळून आले. तसेच त्या ठिकाणी शिकारीसाठी वापरले जाणारी जाळे फासे  विळी सुरा कुराड इ साहित्य आढळून आले. सर्व साहित्य जप्त करून आरोपींवर

 वन्यजीव सरक्षण अधिनियम १९७२कलम अन्वये  ९,३९,४९,५०,५१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.सदर आरोपी १) बळीराम वामन शिंदे २) सोमनाथ नवनाथ घोळवे अशी नावे असून हे दोघे रा.घोळवे वाडी येथील आहेत.
यांना प्रथम वर्ग  न्यायालयात हजर केलं असता त्यांना दोन दिवसाची पोलिस/फॉरेस्ट कोठडी देण्यात आली.
सदर ची कारवाई धैर्यशील पाटील उपवनसंरक्षक सोलापूर बाबा हाके सहाय्यक वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती अलका करे वनपरीक्षेत्र अधिकारी बार्शी इरफान काझी वनपरी मंडळ अधिकारी वैराग , जहांगीर खोंदे वनपरि मंडळ अधिकारी पांगरी इतर सर्व वन अधिकारीं व कर्मचारी यांनी केली.

Post a Comment

0 Comments