कळंब शेतकऱ्याकडून २० हजाराची लाच घेताना कृषी अधिकारी अँटी करप्शनच्या ताब्यात


कळंब |

सामुहिक शेततळ्याचे अंदाजपत्रक / प्रस्ताव तयार करून तो प्रस्ताव अपलोड करून अनुदान मंजुरीस पाठवून देण्यासाठी २० हजार रुपयाची लाच घेताना कळंबच्या तालुका कृषी अधिकाऱ्यास एसीबी पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले आहे. संतोष बाबुराव हूरगट ( वय ५० वर्षे ) असे या लाचखोर कृषी अधिकाऱ्याचे नाव आहे.

यातील तक्रारदार शेतकरी ( वय २२ वर्षे ) यांना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत मंजूर असलेल्या सामुहिक शेततळ्याचे अंदाजपत्रक / प्रस्ताव तयार करून तो प्रस्ताव अपलोड करून अनुदान मंजुरीस पाठवून देण्यासाठी यातील आलोसे संतोष बाबुराव हुरगट , वय (५० वर्षे) कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कळंब यांनी पंचांसमक्ष तक्रारदार यांच्याकडे २०,०००/- रुपये लाचेची मागणी करून २०,०००/- रुपये लाच रक्कम पंचांसमक्ष स्विकारल्याने सदर आरोपी लोकसेवक यांना ताब्यात घेतले असुन पोलीस स्टेशन कळंब , ज़िल्हा धाराशिव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.

हा सापळा पोलीस उप अधीक्षकसिद्धाराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नानासाहेब कदम , पोलीस अमलदार सचिन शेवाळे , सिद्धेश्वर तावसकर, अविनाश आचार्य, चालक दत्तात्रय करंडे यांनी रचला होता.

Post a Comment

0 Comments