पुणे : बंगळुरू महामार्गावरील नऱ्हे येथील भूमकर पुलावर एका कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने समोर असलेल्या एका पिकअप वाहनाला जोरदार धडक दिली. त्यानंतर शिवशाही बस, एक ट्रक, दोन कारला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यातील पिकअप वाहनाची पाठीमागील छत संपूर्ण निघून गेले आहे. तर दोन कारचे सुद्धा मोठे नुकसान झाले आहे.
या धडकेत डस्ट घेऊन निघालेला ट्रक महामार्गावर पलटी झाला. अपघाताची माहिती मिळताच, सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन व पोलीस अंमलदार तसेच भारती वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत कणसे, सिंहगड वाहतूक विभागाचे वाहतूक पोलीस घटनास्थळी पोहचले असून जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहतूक सुरळीत करण्यात येत आहे.
0 Comments