धाराशिव |
अवैधरित्या गुटखा व पान मसाला वाहतुक करणाऱ्या एका तरुणावर धाराशिव ग्रामीण पोलीस सस्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, 8,84,000 ₹ किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की , दि.14.12.2023 रोजी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक हे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पथकास गुप्त बातमी मिळाली की, एक सिलव्हर रंगाची इनोव्हा कार ही अंबेजवळगे शिवारातुन अवैध गुटखा वाहतुक करीत आहे. त्यावर पथकाने लागलीच तेथे जावून समोरुन येणारे सिलव्हर रंगाची इनोव्हा वाहन क्र एम.एच. 14 व्ही 1642 हे पेट्रोलिंग दरम्यान थांबवून चेक केले असता त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत केलेला गोवा गुटखा मिळून आला.
सदर वाहनाचा चालक यास त्याचे नाव गाव विचारले असता त्यांने त्याचे नाव निहाल माजिद काझी, वय 21 वर्षे, रा. खाजानगर गल्ली नं 22 धाराशिव ता. जि. धाराशिव असे सागिंतले त्यावर पथकाने सदर इनोव्हा व त्यातील मिळून आलेला 1) रजनीवास सुगंधीत पान मसाला किमंत अंदाजे 3,07,200, 2) प्रिमीयम झेड एल 1 जाफराणी जर्दा किंमत अंदाजे 76,800₹ एकुण 3,84,000 किंमतीचा माला सह वाहन क्र एम.एच. 14 व्ही 1642 सिलव्हर रंगाची इनोव्हा असा एकुण 8,84,000 ₹ किंमतीचा माल मिळून आलेने जप्त करुन मिळून आलेला माल व आरोपी नामे- निहाल माजिद काझी, वय 21 वर्षे, रा. खाजानगर गल्ली नं 22 धाराशिव ता. जि. धाराशिव यास ताब्यात घेवून आरोपी याचे विरुध्द पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण येथे गुरनं 341/2023 भा.द.वि. सं. कलम 328, 272, 273, 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments