ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला शाश्वत आरक्षण मिळावे. त्यासाठी केंद्र सरकारने पुन्हा घटना दुरुस्ती करून सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गाचे आरक्षण ५० टक्क्यांच्या वर देण्याची तरतूद करावी, असे मत आमदार प्राजक्त तनपुरे यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मांडले.
गुरुवारी रात्री सव्वा अकरा वाजता मराठा आरक्षणाला पाठिंबा देताना आमदार तनपुरे बोलत होते. ते म्हणाले, मराठा समाज इतक्या तीव्रतेने आरक्षण मागत आहे. त्यावर सखोल चर्चेची गरज आहे. समाजातील विद्यार्थी अतिशय मेहनतीने अभ्यास करून चांगले गुण मिळवतात.
मात्र, प्रवेशापासून मुकतात अथवा त्यांना अधिक फी भरावी लागते. त्यावेळी विद्यार्थ्यांमध्ये निराशा पसरते. उद्विग्नता येते. मराठा समाज बहुतांशी शेती करतो. संकटांनी घेरलेल्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. महागाई वाढते आहे.
0 Comments