बार्शी |
तालुक्यातील धोत्रे येथे आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते ४१ लाख रुपये विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.तसेच धोत्रे गावासाठी विविध योजनांच्या माध्यमातून विकास कामे मंजूर केल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार करण्यात आला.
धोत्रे येथे आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते आमदार निधीतून सभामंडप बांधणे यासाठी १६ लाख,जनसुविधा योजनेअंतर्गत ग्रामपंचायत ऑफिस बांधणे यासाठी १५ लाख, २५/१५ योजनेअंतर्गत गावाअंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्ता करणे यासाठी १० लाख रुपये मंजूर कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
धोत्रे येथील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत चालू असलेल्या कामाची आमदार राजाभाऊ राऊत यांनी पाहणी केली तसेच गणपती मंदिराचे भूमिपूजन केले.
बार्शी तालुक्याचा सर्वांगीण विकास करणे हाच आमदार राजाभाऊ राऊत यांचा ध्यास असुन गावा-गावात विकास कामांचा धडाका सुरू आहे,बार्शी तालुक्यात सर्वत्र विकासाची गंगा वाहत आहे.तालुक्यात आमदार राजाभाऊ राऊत यांच्या मार्फत कोट्यावधींची विकासकामे चालु आहेत.
यावेळी प्रभाकर डमरे,काका काटे,सरपंच हेमंत जाधवर,उपसरपंच सचिन लांडे,अशोक लांडे,बाबुराव जाधवर,प्रदीप जाधवर,दादाराव जाधवर तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments