एक लाखाची लाच भोवली; फौजदार रजपूत 'लाचलुचपत'च्या ताब्यात



सोलापूर |

पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी तक्रारदाराकडे दोन लाखांची लाच मागणी करून एक लाखावर तडजोड केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यातील फौजदार विक्रमसिंह रजपूत याला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिसांनी नुकतेच ताब्यात घेतले आहे.लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे रजपूत यांच्याबद्दल एक तक्रार आली होती. एका गुन्ह्यात प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी फौजदार रजपूत याने दोन लाखांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार होती.

सोलापूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उप निरीक्षक विक्रम प्रतापसिंग रजपूत नेमणूक एमआयडीसी पोलीस ठाणे यांनी १ लाख रुपयांची लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पीएसआय विक्रम रजपुत यांनी अयोग्यरित्या बेकायदेशीर परितोषण स्वीकारण्याचा प्रयत्न केला असल्याने त्यांना ताब्यात घेवुन गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया एमआयडीसी पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे सुरु आहे.

Post a Comment

0 Comments