विविध मागण्यासाठी शेतकरी संघटनेचा इशारा

   

बार्शी |

 ४ नोव्हेंबर, उर्वरितांचे कांदा अनुदान तात्काळ द्या, येलोमोजाइक, मुळकुज, खोडखूजची शासनाने जाहीर केलेली व पिकविम्याची नुकसान भरपाई त्वरित द्या. आदी मागण्यांचे निवेदन सोलापूर जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांना शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली देण्यात आले.

त्यावेळी मंगळवेढा तालुकाध्यक्ष सुनील बिराजदार, सचिन आगलावे, बाळासाहेब वाळके, रामभाऊ सारोडे, संभाजी ठोंबरे, रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ता राहुल बिडवे, बळीराजा शेतकरी संघटनेचे अख्तराज पाटील, प्रहार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष संजीवनीताई बारंगुळे, वैशाली ढगे, दत्तात्रय फराडे, सुधाकर गुजरे, आदींसह विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी व बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. मागण्यांची पूर्तता लवकरात लवकर न झाल्यास संबंधित कार्यालयावरती तीव्र स्वरूपाची आंदोलन करणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिला.

Post a Comment

0 Comments