बुलढाण्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या बातमीनं खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात गुरू-शिष्याच्या नात्याला काळीमा फासला गेला आहे. शिक्षकानेच विद्यार्थिनीवर बलात्कार केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे जिल्हा हादरला असून, संताप व्यक्त होत आहे. सतीश विक्रम मोरे असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बुलढाणा जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकानेच अल्पवयीन विद्यार्थिनीवर अनेकदा बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणात पीडित मुलीने बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी शिक्षक सतीश मोरे याच्याविरोधात पोक्सोसह इतर कलामांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
0 Comments